शहरतील महत्वाची स्थळे
जुन्नरला जाताना सुमारे चार फर्लांगावर उजव्या बाजूस ओझर गावाकडे जायला फाटा फुटतो. देवस्थानाकडे जयला कुकडी नदी पार करून जावे लागते.
श्री विघ्नेश्वराचे देवालय पूर्व दिशेकडे तोंड करून उभे आहे. देवालय चारही बाजूंनी दगडी तटाने बंदिस्त करून टाकलेले आहे. ह्या दगडी तटावरून चालण्यासाठी पायवाटही आहे.
ओझरगावी विघ्नेश्वर । जये मारिला विघ्नासूर
तो मी नमिला रूपसुंदर । पिगलाक्ष गजानन ॥
देवाच्या मूर्तीसमोर दहा फुटी ऐसपैस मंडप आहे. मंडपाच्या दारातून बाहेर पडले की काळ्या पाषाणाला उंदीर आहे. ह्या मंडपाला लागूनच दुसरा ऐसपैस असा सभामंडप आहे. त्यापुढे आणखीन एक दहा फुटाचा सभामंडप आहे. त्याच्यापुढे दगडी फरशीचे विस्तृत पटांगण आहे. ह्या पटांगणात दोन दीपमाळा उभ्या आहेत. देवळाचा चुमट मोठा कलाकुसरीचा आहे. त्यावर शिखर आणि सोनेरी कळस आहे. देवालयाचा परिसर फारच रमणीय आहे. देवालयाच्या मंदिरावरील शिखर चिमाजी अप्पांनी बांधले. वसईचा किल्ला जिंकून परत येत असतानाच, चिमाजी अप्पांनीह्या देवालयाचा जीर्णोद्धार करविला.
शिवनेरी किल्ला - ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये ईस्ट कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
लेण्याद्री हा डोंगर जुन्नरच्या उत्तरेला आहे. ह्या डोंगराजवळ जाण्यासाठी मार्गातील कुकडी नदी पार करून जावे लागते. गावापासून हा डोंगर मैल-दीड मैल अंतरावर आहे.
पावसाळ्यात कुकडी नदी अगदी दुधडी भरून वाहात असते. त्यावेळी डोंगरावरील श्रीगणपतीच्या दर्शनाला जाणे केवळ अशक्यप्राय ठरते.
लेण्याद्रिच्या कडेकपारी । गिरिजात्मज तो वास करी ।
मातेसाठी मिरीकुहरी । पार्थिव देवत्व पावले ॥
डोंगरावरील लेणी फारच सुंदर आहेत. ह्या देवालयाच्या सभामंडपाची उंची फार कमी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यापुढील सभामंडप बराच मोठा आहे. त्यात कोरलेले पाषाणाचे सहा खांब असलेले दिसतात. मुख्य गाभारा बराचसा आतल्या बाजूला आहे आणि तेथे बराच अंधार आहे. ह्याच डोंगरातील एका गुहेमध्ये पार्वतीने तपश्चर्या केली. श्री विनायक तेथे प्रगट झाले तेव्हा तिने तिथे श्री विनायकाची प्रतिष्ठपना केली. परंतु ती जागा अतिशय अवघड अशा जागी आहे. त्यामुळे तेथे जाऊन त्या गणपतीचे दर्शन घेण्याचे काम महाकर्म कठीण ठरते.
श्री कालभैरवाची आरती