श्री काळभैरवनाथ पौराणिक कथा

( सदर कथा काशी खंड ग्रंथाप्रमाणे)

श्री क्षेत्र खामुंडी तालुका जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांचे मंदिर ३०० ते ३५० वर्षापूर्वीचे असून श्री काळभैरवनाथ खामुंडी व पंचक्रोशीतील जनतेचे कुलदैवत आहे. नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

श्री काळभैरवनाथांच्या अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे. एकदा श्री विष्णु व ब्रह्मदेव एकत्र बसले असता. त्या दोघांमध्ये आपणामध्ये श्रेष्ठ म्हणून वाद निर्माण झाला. ब्रह्मदेव म्हणाले, 'मी सर्व सृष्टीचा करता आहे, त्यामुळे मी श्रेष्ठ आहे. ' त्यावर विष्णु म्हणाले, 'मी त्या सृष्टीचा पालनकर्ता व तारणहार आहे. तेव्हा मी श्रेष्ठ आहे. ' दोघांचा वाद मिटेना. तेव्हा त्यावेळी तेथे नारदमुनींचे आगमन झाले. नारदमुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रीकाश्रामी जावे जेथे मुनीश्वर अत्री ऋषी, मार्कंडेय ऋषी, बदकाल्लभ ऋषी, दधीची ऋषी,मारीची ऋषी,पिप्पलादमुनि आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो. असा सल्ला दिला.ते दोघे बद्रिकश्रमि गेले. तेथे गेल्यावर सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले की, "आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? हे तुम्ही सांगावे." त्यावर सर्व ऋषीमुनींनी नमस्कार केला असता विष्णु म्हणाले की, "तुम्ही आमच्या दोघानापैकी कुणाला नमस्कार केला." त्यावर ऋषीमुनी म्हणाले.

असंख्य ब्रहांड जयाचा खेळ I घडिता मोडीता न लगे वेळ ||
तो ब्रह्मरूप मृगांकथाळ I अकथ्य जाहला शिव तो ||

'आम्ही तुम्हा दोघांना नव्हे शिवाला नमस्कार केला आहे. तुम्ही श्रेष्ठ आहात ही तुमची विपरती बुद्धी आहे. तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत.' या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही.त्यावर ऋषीमुनींनी सांगितले की, 'तुम्ही ईशान्य दिशेला वेद्पुरी आहे. त्याठिकाणी जावून तुम्ही वेदांना कोण श्रेष्ठ आहे. हे विचारावे.' तेव्हा विष्णु आणि ब्रह्मदेव ईशान्य दिशेला वेद्पुरीस पोहचताच त्यांना महाद्वारात शिवाची प्रतिमा दिसली.

वेदापुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद,सामदेव, अथर्ववेद, ऋग्वेद हे भेटताच विष्णु व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले कि, "तुम्ही दोघे भगवान शिवाचे अंकुर आहेत. हा तुमचा वाद व्यर्थ आहे. भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही." असे त्यांचे उत्तर एकूण दोघांनाही वेदांचा राग आला. ते दोगेही वेदांना व ऋषीमुनींना अभद्र बोलून त्यांचा अपमान करू लागले. तेव्हा वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला.

तेथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले. तेथे ओंकारेश्वरानी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद एकूण घेतल्यावर म्हणाले कि, " तुमचा हा वाद व्यर्थ असून, हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे. तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत." हे ऐकल्यावर विष्णु व ब्रह्माला सर्वांचा राग आला. तेथेही ऋषीमुनी, वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला. 'तुम्ही सर्व शिवाला भुलले.' वे इतर शब्दांत त्यांचा अपमान केला.

वेदांचा, ऋषीमुनिंचा व ओंकारेश्वरांचा अपमान केल्यामुळे श्रीशंकर तेथे प्रकट झाले. ह्या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे श्री शंकराचा राग अनावर झाला. त्यांनी आपला उजवा हात आपटला त्याक्षणी तेथे उग्रमुनी, लांब जटा असलेले, हाती त्रिशूल, कंठी रूद्रमाला, कानात कुंडले अशा उग्ररुपात श्री काळभैरवनाथ अवतिर्ण झाल्यानंतर श्री शंकरास म्हणाले कि, " मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे. ते कार्य सांगावे." तेव्हा श्री शंकर म्हणाले,"ब्रह्मा आणि विष्णु या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? यावरून दोघांचा वाद चालू आहे. तुम्ही वेद्पुरित जावून त्यांचा वाद मिटवावा."

श्री शंकराची आज्ञा घेऊन श्री काळभैरवनाथ वेद्पुरीस जेथे ब्रह्मा आणि विष्णु बसले होते. तेथे तात्काळ आले. तेव्हा त्यांना दोघांनी विचारले की, "तुम्ही कोण व कशासाठी आले आहात?" तेव्हा श्री कालाभैरावानाथांनी सांगितले कि, "मी भगवान शिवाचा अवतार असून मला शिवाने निर्माण केले आहे. तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नाखासारखा असून मी तो तत्काळ सोडवील." तेव्हा श्री कालाभैरावानाथ ब्रह्मदेवास म्हणाले कि, "तुम्ही एकवीस स्वर्गात जा व तेथे माझा मुकूट आहे. तो पाहून या" व विष्णुस सांगितले "सप्तपाताळात जाऊन माझ्या पादुका पाहुन या. जो कुणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम काळभैरवनाथाच्या पादुका पाहण्यासाठी निघालो आहे. अजून किती खोल मला जावे लागेल. त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की, आजपर्यंत लक्षकोटी युगे जाहली व अनंत कोटी ब्रह्मांडातून तुमच्यासारखे कोटी विष्णु आले. ते पाताळात गेले ते अजून वर आले नाहीत." त्यावर विष्णुचा अहंकार संपला. व ते पुन्हा काळभैरावानाथाकडे आले.येईल तोच श्रेष्ठ असेन." त्यानुसार दोघेही जाण्यास तयार झाले. विष्णू सप्तपाताळात जायला निघाले. विष्णू सह्स्रयोजने पाताळात जावू लागले. तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येउन पोहचले तेथे त्यांना पाताळकंद भेटले.

इकडे मुकूट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना कामधेनु व केतकी भेटली. त्यावर ब्रह्मदेवाने विचारले की, "अजून किती ब्रम्हांडे फिरावी लागतील. तेव्हा मुकूट दिसले. " तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की,"तुम्ही आतापर्यंत एक ब्रम्हांड फिरून इथपर्यंत आलात, असे अनंत ब्रम्हांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तेथपर्यंत पोहचाल. तो पर्यंत तुमचे आयुष्य संपेल." तेव्हा मुकुटाचा नाद सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले. की, " मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघी माझ्याबरोबर चला व श्री काळभैरावानाथांना सांगा की, ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत. माझ्यासाठी तुम्ही खोटे बोलले तर तुम्हांला कुठलेही पाप लागणार नाही." त्यावर त्या दोघी येण्यास तयार होवून ते तिघेही श्री काळभैरावानाथांकडे आले. तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकूट पाहून आल्याचे बोलू लागले.साक्षीदार म्हणून कामधेनु व केतकी आहे असे सांगितले.

श्री काळभैरावानाथांनी क्षणात ओळखले की, हे तिघेही खोटे बोलत आहे. त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवाचे शिर उडविले व नंतर कामधेनुस शाप दिला की, "तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल." व केतकीस शाप दिला की, "तू श्री शंकराच्या डोक्यावर असते ते स्थान वर्ज्य होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील." त्यावर त्या दोघींनी माफी मागून उ:शाप मागितला. तेव्हा कामधेनुस सांगितले कि, "तुझे गोमुत्र पंचामृतासारखे राहिल." एवढ्यात श्री भगवान शंकर तेथे प्रकट झाले. हृह्मदेवाचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्याची दया आली. त्यांनी विचार केला कि, अहंकार झाला की मती फिरते व इष्ट देवतांचा, ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवाची ही अवस्था झाली. त्यांना श्री सांगितले कि,"तुझाकडून घडले आहे. तेव्हा तू हे भ्रह्मदेवाचे मुंडके घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा कर. ज्याठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल. तेथे तुझे ब्राह्म्हातेचे पातक संपले. " हे एकून श्री काळभैरावानाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले.

तेथून ते दोघे ओंकारेश्वराकडे आले. तेथे ओंकारेश्वरानी त्यांचा श्रेष्ठत्वाचा वाद एकूण घेतल्यावर म्हणाले कि, " तुमचा हा वाद व्यर्थ असून, हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे. तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत." हे ऐकल्यावर विष्णु व ब्रह्माला सर्वांचा राग आला. तेथेही ऋषीमुनी, वेदांचा व ओंकारेश्वरांचा अपमान केला. 'तुम्ही सर्व शिवाला भुलले.' वे इतर शब्दांत त्यांचा अपमान केला. इकडे श्री शंकराने शिवगणास मनकर्निकेचे पाणी आणण्यास सांगितले व ते शिवमंत्राने ब्राह्मदेवावर शिंपून त्यांना जिवंत केले. तेथे ब्रह्मदेवाचा अहंकार संपला.

श्री काळभैरावानाथ प्रथम तीर्थयात्रेला पातालामध्ये गेले. तेथून स्वर्गात गेले.नंतर वैकुठासी गेले. श्री विष्णुने व लक्ष्मीने त्यांची यथासांग पूजा करून सोन्याचा कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. तेथून मृत्यू लोकी आले. इथे अकरा ज्योतिर्लिंगाची त्यांनी तीर्थयात्रा केली. तरी ब्रह्महत्येचे पातक जाईना. तेव्हा शेवटचा ज्योतिर्लिंग कशी येथे जायचे राहिले होते. म्हणून त्याठिकाणी ते गेले. काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशिर गळून पडले. ब्रह्महत्येचे महापातक फिटले. नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकराची पूजा-अर्चा करून श्री काळभैरावानाथांनी अनुष्टान चालू केले. आठ लक्ष वर्ष तेथे त्यांनी अनुष्टान केले. त्यावेळी श्री शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी श्री काळभैरावानाथावर प्रसन्न होवून वरदान दिले कि, माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत. त्यांचा तू अधिपती होशील व काशीक्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस. काशीक्षेत्री पाहिल्या पूजेचा मान तुला मिळेल.

श्री काळभैरावानाथांना जे वंदन करतात. त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शनाचे पुण्य मिळेत.

श्री कालभैरवाची आरती